Amit Shah On Dr Ambedkar | जाणून घ्याअमित शाह आंबेडकरांविषयी काय म्हणाले
राज्यासह देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राण पेटलेले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेमध्ये केलेल्या आंबेडकर यांच्या विषयी विधानानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असल्याची टीका सुद्धा विरोधक करताना दिसतायेत आणि याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये देखील दिसून येत आहेत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आंदोलन करतायेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत भाजपने नेते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष, ठाकरे गट आणि शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. विधिमंडळाच्या आवारामध्ये नाना पटोले, रोहित पवार आदित्य ठाकरे, सतीश पाटील यासह इतर नेते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Amit Shah On Dr Ambedkar
आमित शाह काय म्हणाले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांचे पालन करणाऱ्या राजकीय पक्षाचा मी सदस्य आहे आम्ही कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही उलट काँग्रेस आंबेडकर विरोधी असल्याचं वारंवार सिद्ध झालेलं आहे असं प्रत्युत्तर गृहमंत्री अमित शहांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे तसंच काँग्रेसनं माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढलेला आहे मोदींची भाषण सुद्धा एडिट करून काँग्रेसने प्रसारित केलेली आहेत प्रसार माध्यमांना माझी पूर्ण विधान दाखवावीत असं आवाहन अमित शहा यांनी केलेलं आहे
अमित शहा काय म्हणाले आहेत ते बघूयात:
अमित शाह अस म्हणले की आता फॅशन झालेली आहे आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर एवढं जर का नाव देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता आम्हाला तर आनंद आहे की आंबेडकर यांचं नाव घेताय आता तुम्ही आंबेडकरांचं नाव 100 पेक्षा जास्त वेळा जरी घेतलं तरीसुद्धा आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं अनेकदा सांगितलं होतं सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहे आणि कलम 370 बाबत देखील ते असहमत होते त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी इग्नोरन्समुळे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला दिला होता असे हे यांचे विचार आहेत ज्यांचा विरोध करत होते त्यांचं नाव केवळ मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे असं हे संपूर्ण स्टेटमेंट आहे.
अमित शहा यांचे पुढे त्यांनी बीसी रॉय यांच्या पत्राचा दाखला दिलेला आहे इतर दाखले सुद्धा दिलेले दिसून येतात अमित शहा म्हणाले आहेत की 1951-52 च्या निवडणुकीत काँग्रेसनं बाबासाहेबांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनं त्याच्यासाठीविशेष प्रयत्न केलं काँग्रेसने स्वतःच्या नेत्यांना भारतरत्न दिलं पण बाबासाहेबांना यांना त्यापासून वंचित ठेवलं काँग्रेसनं देशामध्ये नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांची अनेक स्मारक बांधली पण आंबेडकरांचं एकही स्मारक बांधलं नाही असा आरोप सुद्धा अमित शहा यांनी केला नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक बांधलं असं सुद्धा अमित शहा यांनी स्पष्ट केलं आता हे संपूर्ण जे संसदेतलं भाषण आहे त्याच्यातलं फॅशन वालं जे स्टेटमेंट आहे याला घेऊन विरोधक भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करतायेत.
विरोधकांची भूमिका :
अमित शहा यांच्या विधानामुळं देशाचा आणि संविधानाचा अपमान झाल्याचा दावा करत आदित्य ठाकरे म्हणाले की देशाची जनता रस्त्यावर उतरली आहे कारण हा अपमान फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला नाही तर देशाच्या जनतेचा संविधानाचा देखील अपमान झालेला आहे आज आठवले चंद्रबाबू नितीश कुमार भाजप बरोबर राहणार आहेत का हे उत्तर त्यांनी द्यावं आज अनेक आमदार असे आहेत जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानतात जे आज भाजप बरोबर आहेत ते राजीनामा देणार आहेत आहेत का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला तर सतीश पाटील म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत चर्चा करायला काय हरकत आहे तुमची बाजू तुम्ही मांडा आम्ही आमची बाजू मांडतो जे सत्य आहे ते जनतेसमोर विधिमंडळातून जाऊ दे अमित शहा यांचं वक्तव्य उभ्या देशानं पाहिलं आहे त्यावर कशालाही उतारा काढला तरी तो उतारा चालणार नाही असं सतेज पाटील म्हणालेत.
Amit Shah On Dr Ambedkar | डॉ आंबेडकरांनी लढवलेली निवडणूक :
1947 ला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर अंतरिम सरकार होतं पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 1951-1952 मध्ये म्हणजे ऑक्टोबर पासून ते 52 असे चार महिने या निवडणुका चालू होत्या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे 27 सप्टेंबर 1951 ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर ते पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन आणि समाजवाद्यांची म्हणजे कम्युनिस्टांच्या सोशलिस्ट पार्टी यांची युती झाली आणि इथेच खरी गडबड झाली मुंबई काँग्रेसचे सखा पाटील यांनी निवडणुकी आधीच्या काही महिने अगोदर जाहीरपणे म्हटलं होतं की आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही सखा पाटलांना आंबेडकरांबद्दल आदर होता का तर निश्चितपणे आदर होता पण समाजवाद्यांबद्दलचे त्यांचे विचार वेगळे होते आणि त्याच्यामुळेच सखा पाटलांनी आणि पर्यायानं काँग्रेसनं आंबेडकर यांच्यासमोर उमेदवार दिला म्हणजे बघा आंबेडकरांचा शेड्युल कास्ट फेडरेशन आणि याच्यासोबतच त्यांची जी युती झालेली होती सोशलिस्ट पार्टी यांची युती झाल्यामुळे काँग्रेसनं त्यावेळेस आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिला होता यासोबतच असं म्हणलं जातं की आंबेडकरांसमोर उमेदवार न देण्याची ती घोषणा केली होती तेव्हा आंबेडकर हे नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते मात्र निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवाद्यांसोबत युती केली आणि या पाठिंबाचं आश्वासन सखा पाटलांनी पाळलं नाही लढत कोणामध्ये झाली तर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नारायणराव काजरोळकर नारायणराव काजरोळकरांना 138137 मतं पडली तर बाबासाहेब आंबेडकरांना 123576 या निवडणुकीमध्ये आंबेडकरांचा पराभव झाला 14500 61 मतांनी आता आंबेडकर उभे राहिले होते ते राखीव जागेवरती या राखीव जागेवरती कुणालाच मत न देण्याचा प्रचार त्यावेळेस कम्युनिस्टांनी केला होता आणि त्याचा फायदा काजरोळकरांना झाला असं तत्कालीन नेते प्रके अत्रे यांनी म्हटलेलं आहे बाबासाहेबांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवरती हाच आरोप केलेला आहे तर असा हा आहे पहिल्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवास संदर्भातला म्हणजे म्हणजे ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आणि सोशलिस्ट पार्टी यांची युती झाली त्याच्यानंतर ही समीकरण बदलल्याचं आपल्याला दिसून येतंय
अमित शहा यांनी आंबेडकर यांनी राजीनामा का दिला या संदर्भात जी कारण सांगितली या कारणासंदर्भातली सुद्धा त्यांची माहिती काही पूर्ण नाहीये आंबेडकरांनी राजीनामा देताना जी कारण शहा यांनी सांगितली त्याच्यामध्ये हिंदू कोडबिल याला होणारा विरोध हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे जे की त्यांनी संसदेमध्ये मेंशन केलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते अंतरिम सरकार असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते किंवा कुठल्याही चळवळीमध्ये म्हणजे काँग्रेस प्रणीत चळवळीमध्ये ते सहभागी नव्हते तरीसुद्धा त्यांची निवड झालेली होती यासोबतच बाबासाहेबांची मंत्रिमंडळातील निवड हा पंडित नेहरूंचा एकट्या चा निर्णय नव्हता तर गांधीजींची सुद्धा या संदर्भातली भूमिका फार महत्त्वाची होती
महात्मा गांधीजींच्या मते मिळालेले स्वातंत्र्य हे भारताचे आहे काँग्रेसचे नाही त्याच्यामुळे भिन्न राजकीय दृष्टिकोन असणाऱ्या विद्वानांचा सरकारमध्ये समावेश होणं आवश्यक आहे मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग या ठिकाणी अपेक्षित होता आणि त्याच्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदामंत्री करण्यात आलं अमित शहा म्हणतात तसं जातींना देण्यात येणार आरक्षण हिंदू कायद्याचं संहिताकरण यासोबतच परराष्ट्र धोरण काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद होते नेहरू आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते आता एक गोष्ट लक्षात घ्या पुणे करारानुसार आपल्या इथं त्यावेळेस राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यावरती 1947 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी राखीव जागा पूर्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता त्यांच्या या प्रस्तावाने संतप्त झालेल्या बाबासाहेबांनी संविधान सभेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती त्याच्यामुळे पटेलांनी मांडलेला प्रस्ताव रद्द सुद्धा करण्यात आलेला होता.
हिंदू कोड बिल:
आता हिंदू कोड बिल जे आहे मालमत्ता विवाह घटस्फोट दत्तक घेणं वारसा हक्क या संदर्भातल्या अधिकारांच्या संबंधित कायद्यांच्या संबोधित करणार हे हिंदू कोड बिल होतं 1947 एप्रिल महिन्यामध्ये ते संसदेत सादर करण्यात आलं आंबेडकरांनी या कायद्याचं वर्णन आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सामाजिक सुधारणा करणारा उपाय असं केलेलं होतं आणि याच्या बाबतीत पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सहमत सुद्धा होते होते पण 1948 ते 1951 या काळात देशातील महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा करणाऱ्या या हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शन झाली धरणं झाली आंदोलन झाली देशभरातील हिंदू नेते आणि हिंदू संघटना एकच म्हणायचे की या विधेयकाच्या माध्यमातून त्यांच्या धर्माला भ्रष्ट केलं जातंय आणि हे मोठं षड्यंत्र आहे मार्च 1949 पासून अखिल भारतीय हिंदू विरोधी कोड बिल समिती अशा या कायद्याविरोधात सक्रिय झाली या या आंदोलनामध्ये स्वामी करपात्री महाराज हे आघाडीवरती होती करपात्री महाराज यांनी देशभर फिरून हिंदू कोड बिरल विरोधात भाषणं दिली त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय रामराज्य परिषद या नावाची एक संघटना सुद्धा स्थापन केली ज्याने नंतर अनेक राज्यांमध्ये निवडणुकाही लढवल्या काही ठिकाणी त्यांना विजय सुद्धा मिळाल्या स्वामी करपात्री यांच्या मते हिंदू कोडबिल हिंदू प्रथा परंपरा आणि धर्मशास्त्राच्या विरोधात आहे नेहरू आणि आंबेडकर हे त्यांच्या निषेधाचे लक्ष होते त्याच्या त्यानंतर अनेक संघटनांनी फक्त दिल्लीमध्ये डझनभर निषेध रॅली सुद्धा काढल्या देशाच्या
कानाकोपऱ्यामध्ये निदर्शन झाली या निदर्शनांमध्ये वडिलांच्या आणि पतीच्या मालमत्तेशिवाय घटस्फोट घेण्याच्या महिलांच्या अधिकाराला हिंदू विरोधी म्हटलं गेलं आणि या सगळ्याच्या निशाण्यावर दोन नेते होते एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 5 फेब्रुवारी 1951 रोजी कायदा मंत्री आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये परत एक एकदा मांडलं होतं संसदेमध्ये तीन दिवस त्या विषयावरती चर्चा सुरू होती
हिंदू कोड बिलाच्या विरोधात सर्वात मोठा युक्तिवाद असा होता की त्या वेळेसच्या संसदेचे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांना एवढे मोठे विधेयक मंजूर करण्याचा नैतिक अधिकार नाही दुसरा युक्तिवाद असा होता की कायदा फक्त हिंदूंसाठीच का आणायचा तो इतर धर्मियांना सुद्धा लागू व्हायला पाहिजे राजेंद्र प्रसाद हे सुद्धा या हिंदू कोड बिल याच्यासाठी अनुकूल नव्हते आणि ते त्या विधेयकाच्या विरोधामध्ये होते त्यांच्या निषेधार्थ त्यांनी नेहरूंना अनेक पत्र सुद्धा लिहिली आणि 1950 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी नेहरूंना या विधेयकाबाबत इशारा दिलेला होता कडवे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान
अधिकार देण्याची तयारी नव्हती हिंदू धर्मावरील आक्रमण अशा प्रतिक्रिया देऊन या नेत्यांनी या एकूणच विधेयकाला मोठा विरोध केला होता हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बऱ्याच तथाकथित हिंदू समाजाने बाबासाहेबांविषयी घृणास्पद प्रतीक सुद्धा दिल्या होत्या इतकंच काय तर बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चे सुद्धा काढले गेले होते बाबासाहेबांनी त्यावेळच्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना यासोबत प्रसार माध्यमांना या बिलाच्या पाठीमागे उभं राहण्याचा आवाहन केलं होतं परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणेत्यावेळेस कोणी उभं राहू शकलं नाही समाजातील समानतेचे सकारात्मक बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा याच्यामुळे त्यावेळेस फलद्रूप झाली नाही ती मातीमोल ठरली होती आता आता समान हक्क महिलांना सुद्धा देण्यासाठी तुम्ही विरोध करतायत असा सवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस उपस्थित केला होता हिंदू कोड बिल संमत व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लढले पण दुर्दैवानं त्यावेळेस अधिवेशन संपताना या बिलाची फक्त चार कलमच मंजूर झाली होती संसदेतला विरोध आणि एकूण चर्चा पाहता पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिलाचे चार भागात विभाजन घोषणा केली नेहरूंच्या या प्रस्तावाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते नेहरू ही परिस्थितीशी तडजोड करत होते किंवा ते टाळू इच्छित आहेत ही एकूण परिस्थिती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं नाराज आंबेडकर यांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आता बघा नेहरूंना हा कायदा बहुमतावरती करायचा होता या विधेयकाला विरोध एवढा होता की नेहरूंना हे लक्षात आलं होतं की जनादेशाशिवाय हा कायदा करणं सोपं नाही आणि या कारणास्तव त्यांनी ते विधेयक निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यानंतर नंतर असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता म्हणजे फक्त कारण नेहरू या इतकंच मर्यादित नाहीये इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे त्यावेळेस होत असलेला विरोध म्हणा निदर्शन म्हणा काय काय त्यावेळेस वक्तव्य केली गेली हे समजून घेणे फार गरजेचे आहे आता या हिंदू कोड बिलावरच नेहरूंचे एक स्टेटमेंट सुद्धा फार महत्त्वाचं आहे कायदा मंत्र्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावरती मी ठाम आहे असं या हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर नेहरूंनी उघडपणे सांगितलं होतं तरीसुद्धा या विधेयकाला झालेला विरोध काही कमी झाला नाही